आसाम सरकारने उपहारगृहं, हॉटेल्स तसेच इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर जारी केली बंदी

आसाम सरकारने राज्यभरातील सर्व उपहारगृहं, हॉटेल्स, तसंच सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर सामुदायिक ठिकाणी गोमांस पुरवण्यावर आणि खाण्यावर पूर्णतः बंदी जारी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काल ही घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत गोमांस सेवनावरील विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणांना मंजुरी देण्यात आली. या आधी, केवळ मंदिरांजवळ गोमांस सेवनावर बंदी घालण्यात आली होती, मात्र हा निर्णय आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.