डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 27, 2025 5:20 PM | Army | conflict

printer

कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं – संरक्षण मंत्री

छोट्या चकमकींपासून ते वर्षांनुवर्षांच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते मध्यप्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या रण-संवाद उपक्रमात संबोधित करत होते.

 

सध्याच्या अनिश्चित भूराजकीय परिस्थितीमुळे युद्धाला तोंड फुटणं किंवा ते थांबणं यांपैकी कशाचंही भाकित करता येत नाही असं ते म्हणाले.