डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरचे लाचखोरीचे आरोप गंभीर असून त्यांना अटक करावी- राहुल गांधी यांची मागणी

अदानी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात अदानी प्रकरण तसंच उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधला हिंसाचार या मुद्द्यांवरून गदारोळ झाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आणि प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर गदारोळ कायम राहिल्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत, अदानी लाचखोरी प्रकरण, तसंच उत्तर प्रदेशातल्या संभल, आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. सभागृहाचं कामकाज सुुरु ठेवण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. मात्र गोंधळ सुरु राहिल्यानं  कामकाज प्रथम साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे गंभीर आरोप असून त्यांना अटक करावी, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.