गुजरातमध्ये अहमदाबाद इथं काल दुपारी एअर इंडियाचं एआय-171 हे प्रवासी विमान रहिवासी भागात कोसळलं; विमान दुर्घटना अन्वेषण विभागानं या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटनेनं ठरवलेल्या प्रक्रियेनुसार ही चौकशी केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून 242 जण होते. त्यामध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 नागरिक आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश होता. या अपघातात विमानंतल्या 241 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं एयर इंडियानं सांगितलं. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च टाटा समूह करणार आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तसंच अपर्णा महाडीक, दीपक पाठक, मैथिली पाटील या महाराष्ट्रातल्या नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. दीवमध्ये राहणारा एक प्रवासी या दुर्घटनेतून वाचला आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल संध्याकाळी दुर्घटना स्थळाला भेट दिली; तसंच नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमित शहा म्हणाले….
घटना से पूरा देश शुद्ध है और पूरा देश एक साथ पूर्ण संवेदनाओं के साथ ये जो दुर्भाग्यपूर्ण हादसे में पैसेंजर हताहत हुए हैं इनके परिजनों के साथ खड़ा है। एक यात्री का बचने का अच्छा समाचार मिला है। मैं उनको मिलकर आया हूँ मृत्यु। आंकड़ा तो डीएनए परीक्षण और यात्रियों की पहचान के बाद ही अथॉरिटी अधिकृत रूप से घोषित करेगी। एविएशन डिपार्टमेंट ने अपनी जाँच शुरू कर दी है और जांच तेजी से आगे बढ़े इसके लिए भी एविएशन मंत्री जी ने सूचनाएं दी है।
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमुळं काँग्रेसनं राज्यभरात आयोजित केलेले मशाल मोर्चे पुढचे 2 दिवस स्थगित केले आहेत. अपघाताच्या सर्व तपशीलांबाबत समन्वयासाठी मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया, गुजरात सरकार यांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना 079-232-51900, 9978405304, 011-24610843 आणि 9650391859 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.