मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत यंदा राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात राज्यात १५ हजार शेततळी निर्माण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यासाठी राज्य सरकारन १०० कोटी रूपये अनुदान मंजूर केलं असल्याची माहिती पुणे कृषी विभागाचे मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक रवींद्र भोसले यांनी दिली आहे. पुणे विभागानं जिल्हानिहाय शेततळयांचं उद्दिष्ट निश्चित केलं असून शेतक-यांकडून महाडीबीटी यंत्रणेतून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.