हिंडेनबर्गनं केलेले आरोप अदानी समूहानं फेटाळले

अदानी समूहानंही हिंडेनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्या समूहावर या अमेरिकन कंपनीने केलेले हे सर्व आरोप काल्पनिक आणि दुर्भावनापूर्ण आहेत, तसच त्यांच्या वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने केले आहेत, अशी प्रतिक्रिया अदानी समूहाने दिली आहे. या आरोपांबाबत या आधीच चौकशी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहेत, असंही अदानी समूहाने म्हटलं आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्याविरोधातील हिंडेनबर्ग अहवालाचा भारतीय म्युच्युअल फंड्स संघटनेनं निषेध केला आहे. भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेत खोडा घालण्याच्या उद्देशानं हिंडेनबर्ग संस्था अनावश्यक अविश्वासाचं वातावरण तयार करत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.