केंद्र सरकारच्या महिला बालविकास मंत्रालयाच्या वतीनं देशात ७वा पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेसंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे म्हणाल्या…
स्थानिक पातळीवर कुपोषणाची समस्या ओळखून आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय व निरोगी राहण्यासाठी पालकांना विविध कार्यक्रमा द्वारे प्रोत्साहीत केले जात आहे. स्थन पान आणि पूरक आहाराचे महत्व पटून देणे यावर देखील भर दिला जात आहे. यावर्षीचा पोषण पंधरवडा हा कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्न असून विविध उपक्रम आणि कार्यक्रमा द्वारे सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकल्प स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे.

लातूर जिल्ह्यात विविध गावात पोषणाचं महत्व सांगण्यासाठी गरोदर मातांसह ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे. साई गावातील ग्राम दरबारात १४ गरोदर मातांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.