डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण होणार आहे. अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कांरान गौरवण्यात येणार आहे. याबरोबरच चित्रपट निर्मिती आणि अभिनयासाठीच्या इतर पुरस्कांरांचंही वितरण होणार आहे. कन्नड चित्रपट कांतारा मधल्या अभिनयासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तमिळ चित्रपट थिरूचित्रमबलमसाठी नित्या मेनन आणि गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेससाठी मानसी पारेख यांना देण्यात येणार आहे. यासह अनेक पुरस्कारांचं वितरण यावेळी होईल.