डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विज्ञान भारती संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार

विज्ञान विषयाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या विज्ञान भारती या संघटनेचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या पुण्यात लोणी काळभोर इथल्या एमआयटी मध्ये होणार आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएस-आयआर-चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जीतेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ आदी मान्यवर या अधिवेशनाच्या विविध सत्रात सहभागी होणार आहेत.