सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश असेल. यावेळी सात सैनिकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वदेशी हेलिकॉप्टर ध्रुव आणि एमआय१७ देखील संचलनात सामील होतील.