डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुण्यात 13 फेब्रुवारीपासून रंगणार तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 अर्थात पिफ-13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते 13 तारखेला होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘शो मॅन-राज कपूर’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टींग्विशिंग अवॉर्ड या लक्षवेधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे.
महोत्सवात विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा होणार असून रसिकांना जगभरातले नावाजलेले चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.