डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

येत्या 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान रंगणार 23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी काल पुण्यात पत्रकार परिषेदत याबाबत घोषणा केली. या महोत्सवात मराठी चित्रपटांबरोबरच दीडशेहून अधिक देशी-परदेशी चित्रपट प्रेक्षकांना बघता येतील. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांची जन्मशताब्दी ही या वर्षीच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात 107 देशातल्या 14 चित्रपटांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाला संत तुकाराम चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.