डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

२२ वा दिव्य कला मेळा आजपासून इंडिया गेट येथे होणार सुरू

नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं २२ वा दिव्य कला मेळा आजपासून सुरू होत आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागानं देशभरातल्या दिव्यांग कलाकारांची प्रतिभा, सर्जनशीलता आणि उद्योजकता यांचं दर्शन घडवण्यासाठी या ११ दिवस चालणाऱ्या मेळ्याचं आयोजन केलं आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात शंभरहून अधिक दिव्यांग उद्योजक भाग घेतील.