डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ठाण्यात उद्यापासून २१वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु

मुंबई आणि ठाण्यात उद्यापासून २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव सुरु होत असून त्याचं उद्घाटन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

 

या महोत्सवात ६० हुन अधिक देशी विदेशी चित्रपट सादर होणार असून पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना एशियन कल्चर पुरस्कार प्रदान केला जाईल. हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे उत्तम आशियाई चित्रपटही रसिकांपर्यंत पोहचावेत यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं महोत्सवाचे संचालक संतोष पाठारे यांनी सांगितलं.