18वं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं आजपासून भुवनेश्वर इथं आयोजन

18 व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात होत आहे. यासाठी 50 देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या युवा प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमाने संमेलनाची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

 

विविध क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती, परदेशी भारतीय समुदायातील लोकांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील. यंदा ‘विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान’ ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे. या विषयावरील आवृत्तीच्या प्रमुख पाहुण्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालू अधिवेशनाला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून सुटणाऱ्या प्रवासी भारतीय एक्स्प्रेस या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. ही गाडी तीन आठवड्यांसाठी विविध ठिकाणी प्रवास करणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.