ठाणे शहरात आणखी चार दिवस ५० टक्के पाणीकपात केली जाणार असून शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून १२ तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं याकाळात नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होईल, असं पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे.
Site Admin | December 13, 2025 3:09 PM | Thane | Water Supply
ठाण्यात पाणीटंंचाई, ५० टक्के पाणीकपात