मेट्रो ४ च्या पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. ही मेट्रो वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख या मार्गावरून धावणार आहे. या मार्गाची लांबी ३५ किलोमीटर असून ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याचा मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या मेट्रोवर एकूण ३२ स्थानके असून या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर १३ लाखांहून अधिक प्रवासी इथून प्रवास करतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मोगरपाडा इथं डेपोसाठी ४५ हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. याचा फायदा मेट्रो ४, मेट्रो ४ अ तसंच मेट्रो १० आणि मेट्रो ११ साठी देखील डेपो म्हणून उपयोग केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.