थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या भारतीय दूतावासाने तिथल्या भारतीय पर्यटकांसाठी सूचना जारी केल्या आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं. थायलंडच्या पर्यटन प्राधिकरणानं देशातल्या सात प्रांतांमधल्या अनेक पर्यटक ठिकाणांना भेटी न देण्याचा सल्ला दिला. बुधवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात थायलंडचे पाच जवान जखमी झाले. यानंतर दोन्ही देशांनी परस्परांच्या राजदूतांना पदच्युत केलं.
थायलंड आणि कंबोडिया यांच्यातल्या सीमेजवळ दोन देशांच्या लष्करांमध्ये बुधवारी झालेल्या संघर्षात थायलंडच्या १४ नागरिकांचा मृत्यू झाला, तर इतर ४६ जण जखमी झाले. कालही सीमेलगतच्या किमान सहा ठिकाणी चकमकी उडाल्या.