January 14, 2026 12:24 PM | Accident | Thailand

printer

थायलंडमध्ये प्रवासी ट्रेनवर क्रेन कोसळून किमान २२ ठार

ईशान्य थायलंडमध्ये प्रवासी ट्रेनवर क्रेन कोसळून किमान २२ जण ठार झाले, तर इतर ६४ जण जखमी झाले. उंचीवर काम करणारी ही क्रेन चालत्या ट्रेनवर कोसळल्यामुळे ट्रेन रुळांवरून घसरली आणि तिला आग लागली. ही आग आटोक्यात आणल्याची आणि ट्रेनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढायचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ट्रेनमध्ये १९५ प्रवासी असल्याचं थायलंडच्या दळणवळण मंत्र्यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश दिल्याचंही ते म्हणाले.