अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड आणि कंबोडिया दरम्यान चकमकी सुरु आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमधे शस्त्रसंधीकरण्यावर सहमती झाली असल्याचं ट्रंप यांनी जाहीर केलं होतं. मात्र कोणताही शस्त्रसंधी झालेला नाही असं थायलंड सरकारने स्पष्ट केलं आहे. तर कंबोडियाने अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाही. दरम्यान यो दोन देशातल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आसियान संघटनेच्या परराष्ट्रव्यवहारमंत्र्यांची बैठक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मलोशिया बोलावणार आहे.