डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान ४९ लोकांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. मृतांमध्ये १५ लहान मुलांचा समावेश असून, एका खाजगी युवा शिबिरातून २७ मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ८५० लोकांना वाचवण्यात यश आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

दरम्यान, या भागात आणखी पाऊस पडून पुन्हा पूर येण्याची शक्यता तिथल्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 

 

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट यांनी शोधकार्याला गती देण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीच्या घोषणेला मुदतवाढ दिली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी आपलं प्रशासन स्थानिक प्रशासनासोबत समन्वयानं काम करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा