December 30, 2025 1:45 PM

printer

पिनाक या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिआरडीओच्या  पिनाक या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चांदीपूर इथं यशस्वी चाचणी झाली. या अग्निबाणाची क्षमता १२० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य अचूक साधण्याची असून, चाचणीमध्ये अग्निबाणानं हे लक्ष्य पूर्ण केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे.