डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या ६ गडी गमावून ३३९ धावा

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज चेन्नई इथं सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात दिवसअखेर भारतानं ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या. आर आश्विननं आज नाबाद शतक झळकावलं. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता. 

मात्र भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैसवालनं ५६ धावा केल्या. पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६ धावा करुन बाद झाले. तर शुभमन गिल शून्यावर बाद झाला. ऋषभ पंतनं ३९, तर के एल राहुलनं १६ धावा केल्या. भारताची स्थिती ६ बाद १४४ अशी झाली. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी खेळपट्टीवर पाय रोवत डावसंख्येला आकार दिला. आजचा खेळ थांबला तेव्हा जडेजा ८६, तर आर अश्विन  १०२ धावांवर खेळत होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.