भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची आज घोषणा केली. या संघात उपकर्णधार ऋषभ पंत यानं पुनरागमन केलं आहे, तर वेगवान गोलंदाज आकाशदीप याचंही पुनरागमन झालं आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि एन जगदिशन यांना या संघातून वगळण्यात आलं आहे.
संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गील याच्याकडे असेल.
या मालिकेतला पहिला सामना येत्या १४ नोव्हेंबरपासून कोलकाता इथं, तर दुसरा सामना २२ नोव्हेंबरला गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे.
भारताच्या कसोटी संघात कर्णधार शुभमन गिल याच्यासह, उपकर्णधार ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाश दीप यांचा समावेश आहे.