भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली.ऋषभ पंत ११८ धावांवर बाद झाला. मात्र केएल राहुल शतक झळकवल्यानंतरही अजून खेळतो आहे.
भारतानं कालच्या दोन बाद ९० धावांवरुन आज पुढचा खेळ सुरू केल्यानंतर कर्णधार शुभमन गील ८ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर राहुल आणि पंत यांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या ४ बाद २९७ धावा झाल्या होत्या आणि भारताकडे ३०३ धावांची आघाडी होती.