अमेरिकेच्या ‘टेस्ला’ या कंपनीनं आज मॉडेल ‘वाय’ या आपल्या नव्या इलेक्ट्रिक वाहनासह भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ’टेस्ला’ कंपनीच्या पहिल्या शोरूमचं उदघाटन झालं.
मुंबई ही केवळ भारताची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन उद्योगाची राजधानी नसून, एक उद्योजकीय केंद्र देखील आहे. जागतिक इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योग क्षेत्रातल्या या प्रमुख कंपनीनं महाराष्ट्राला आपल्या प्रवासाचा भागीदार समजावं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले