डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांना विनंती

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारातानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश म्हणाले. गैर राज्यसंस्था गटांना आणि दहशतवादी संघटनांना शस्त्र पुरवठा होणं हा जागतिक धोका असून याचा सामना एकत्रितपणे केला पाहिजे असं ते म्हणाले.