मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गोदीचेच कर्मचारी असणाऱ्या या दोघांपैकी एकानं दारूच्या नशेत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला आणि नौदल गोदीवर हल्ला होणार असल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या कुणा व्यक्तीकडून मिळाल्याचा दावा केला. पोलिसांनी या फोनचा माग काढत फोन करणाऱ्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
Site Admin | November 16, 2025 7:12 PM | Terrorist attack on Mumbai's naval dock
मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडुन दोघांना अटक