पारंपारिक स्पर्धा, दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान असल्याचं लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेकरता युवकांना सक्षम करण्यासाठी आयोजित ‘यंग लीडर्स फोरमला‘ संबोधित ते बोलत होते.
आव्हानांच्या या युगात, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रनिर्माण हे अविभाज्य आहेत. जागतिक स्तरावर जोडली गेलेली आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक असलेली आजची नवी पिढी या नव्या युद्धक्षेत्रामध्ये केंद्रस्थानी असल्याचं द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं.