टेनिसपटू सुमित नागलची स्वीडीश ओपनमध्ये आगेकूच

टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडीश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा सहा – चार, सहा – तीन, असा पराभव केला. या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा ६८ व्या स्थानी पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.

 

दरम्यान, या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी जोडीला फ्रान्सच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.