डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टेनिसपटू सिमोना हॅलेपची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलेप हिनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिचा मायदेश रोमेनियातल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यानंतर तिनं हा निर्णय जाहीर केला. सिमोनानं २०१८मध्ये स्लोन स्टीफन्स हिला हरवून फ्रेंच ओपनचं, तर २०१९मध्ये सेरेना विल्यम्सला हरवून विम्बल्डनचं अजिंक्यपद पटकावलं होतं. २०२२च्या यूएस ओपन स्पर्धे पहिल्याच फेरीत हरल्यानंतर तिच्यावर बंदी असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप झाला होता, ज्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली गेली. याविरोधात तिनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनकडे दाद मागितल्यानंतर ही बंदी ९ महिन्यांवर आली. यानंतर तिनं गेल्या वर्षी मायामी खुल्या टेनिस स्पर्धेतून पुनरागमन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.