सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं एटीपी २५० अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर ४-६, ६-३, ७-५ अशी मात करून आपल्या कारकीर्दीतलं १०१ वं, तर हार्डकोर्टवरचं ७२ वं विजेतेपद पटकावलं आणि हार्डकोर्टवर सर्वाधिक विजेतेपदांचा रॉजर फेडरर याचा विक्रम मोडीत काढला. आता जोकोविचनं एटीपीतून माघार घेतल्यामुळं त्याच्या जागी मुसेटी या फेरीत खेळेल. त्याचा पहिला सामना कार्लोस अल्काराज याच्याशी होणार आहे.
Site Admin | November 9, 2025 2:08 PM | ATP finals | Novak Djokovic | Tennis
टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार