टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू जेन्निक सिन्नर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानं, त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी आली आहे. ९ फेब्रुवारी ते ४ मे या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. प्रशिक्षकांकडून उपचारांदरम्यान उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं गेल्याचा दावा सिन्नर यानं केला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीनं त्याला निर्दोष मानलं होतं. मात्र जागतिक उत्तेजक विरोधी यंत्रणा अर्थात वाडानं त्याच्या विरोधात एका वर्षाच्या निलंबनासाठी अपील केलं होतं. अखेर वाडानं दिलेला तीन महिने निलंबनाचा प्रस्ताव प्रस्ताव सिन्नरनं स्वीकारला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.