May 17, 2025 1:47 PM | Tennis 2025

printer

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनर अंतिम फेरीत दाखल

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनर याने काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलचा १-६, ६-०, ६-३ असा पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्याची गाठ स्पेनच्या कार्लोस अल्कराझ याच्याशी पडेल.

 

सिनरने इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकल्यास ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा इटालियन खेळाडू ठरेल. यापूर्वी १९७६ मध्ये ॲड्रियानो पनाट्टा याने ही स्पर्धा जिंकली होती. दरम्यान, कार्लोस अल्काराझ यानेही प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.