डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या मियोमिर केस्मानोविक याच्याबरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचा सामना फ्रान्सच्या आद्रे मानारिनो आणि ज्योवां मेशी पेरिका या जोडी बरोबर होणार आहे. भारताचे एन श्रीराम बालाजी आणि युकी भांबरी हे खेळाडूही स्पर्धेत भाग घेत आहेत.