डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता

राज्यातल्या विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली असून यासंदर्भातले शासननिर्णय नियोजन विभागानं आज जारी केले. यामध्ये तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १ हजार ८६५ कोटी, मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या विकासासाठी ६८१ कोटी, कोल्हापूर मधल्या जोतिबा मंदिराच्या विकासासाठी २५९ कोटी, अष्टविनायक मंदिरांच्या विकासासाठी १४८ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा समावेश आहे.    

 

जामखेड तालुक्यात चौंडी इथं ६ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली असून यासंदर्भातला शासननिर्णय आज नियोजन विभागानं जारी केला आहे. या विकास आराखड्यांमुळे या मंदिर आणि परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा