टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना अटक

टेलिग्राम या संदेशवाहक ऍप्लिकेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव यांना फ्रान्समध्ये पॅरीस इथं काल अटक करण्यात आली. टेलिग्राम या समाजमाध्यमावर गुन्हेगारी कारवायांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी नियंत्रक नेमलेला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं, त्या अंतर्गत ही  अटक केल्याचं फ्रान्समधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.