डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2025 10:18 AM | Almatti Dam

printer

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावाला तेलंगणाचा विरोध

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या प्रस्तावाला तेलंगण राज्यानं विरोध केला आहे. तेलंगणचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितलं की, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकच्या प्रस्तावावर सरकार आपली बाजू मांडेल. सूर्यपेट जिल्ह्यात काल बोलताना मंत्री म्हणाले की, सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होत असून त्यात तेलंगणची बाजू आपण मांडणार आहोत. कृष्णा आणि गोदावरीच्या पाण्यातील राज्याच्या वाट्याशी कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाणार नाही असं रेड्डी यांनी स्पष्ट केलं.