तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात बनावट चलन रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त, ८ जणांना अटक

तेलंगणात कामारेड्डी जिल्ह्यात पोलिसांनी बनावट चलन रॅकेट उघडकीला आणलं आहे. याप्रकरणी १२ जणांच्या आंतरराज्यीय टोळीतल्या आठ जणांना अटक केली. या आरोपींना बिहार आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून अटक केली. यासाठी विशेष पथकं स्थापन केली होती. अटक केलेल्यांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याचं बनावट चलन जप्त केलं.