तेलंगणाच्या मंत्रिमंडळानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे. याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं तेलंगणा मंत्रिमंडळानं तेलंगणा पंचायत राज अधिनियम, २०१८ च्या कलम २१ च्या पोटकलम ३ मध्ये सुधारणा करायला काल मंजुरी दिली.
आता या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार एक अध्यादेश जारी करून, तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं तेलंगणाचे महसूल मंत्री पी. श्रीनिवास रेड्डी यांनी बातमीदारांना सांगितलं.