तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तंत्रज्ञानाचा गैरवापर विनाशकारी ठरू शकतो म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा,असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल हरियाणातल्या फरीदाबाद इथं जे सी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या.प्रगतीचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध झाले असून तंत्रज्ञानाच्या विकासामुळं आणि दुर्गम भागात इंटरनेटच्या उपलब्धतेमुळं ऑनलाइन रोजगारांची संख्या निर्माण झाली आहे.असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.या विद्यापीठानं अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी करार केल्याच्या उपक्रमाचं कौतुकही राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं