May 4, 2025 3:17 PM | Tech Wari

printer

मंत्रालयात ‘टेक वारी’ प्रशिक्षण आठवडा साजरा होणार

टेक वारी-महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”चं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी हा प्रशिक्षण आठवडा ५ ते ९ मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे.  या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ९ मे रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.