December 30, 2025 7:38 PM | Teacher Recruitment

printer

शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

राज्यातली शिक्षक भरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज होईल. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील तर परीक्षा परिषदेचे आयुक्त सदस्य सचिव असतील. याशिवाय इतर ३ सदस्य या समितीत असतील. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही परीक्षा परिषद हे काम करेल. सध्या TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा या परिषदेकडून घेतली जाते.