राज्यातल्या १०९ शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षक दिनानिमित्त अध्यापनात विशेष कामगिरी करणऱ्या शिक्षकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा ३८ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, आदिवासी विभागातून १९ प्राथमिक शिक्षक, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८ शिक्षिकांची निवड झाली आहे. कला आणि क्रीडा विषयांसाठी दोन आणि स्काऊट गाईडसाठी दोन शिक्षकांना तर दिव्यांग शिक्षक विभागात एक पुरस्कार मिळणार आहे.
येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्यशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.