केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये असुरक्षित आणि असंघटित समुदायांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्याचं प्रमाण वाढवणे, क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत औषधे आणि निदानाची तरतूद करणे आणि पोषण सहाय्य म्हणून क्षयरोगाच्या पोषण योजनेअंतर्गत रुग्णाला दरमहा एक हजार रुपये देणे यांचा समावेश आहे. याशिवाय क्षयरोगाच्या बेपत्ता असलेल्या रुग्णांना शोधण्यासाठी, या व्याधीमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि नवीन लोकांना संसर्गापासून रोखण्यासाठी 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील यासाठी निश्चित केलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रकाशित केलेल्या जागतिक क्षयरोग अहवाल, 2024 नुसार, भारतात क्षयरोगाच्या संसर्ग दरात 17 पूर्णांक 7 दशांश टक्के घट झाली आहे. 2015 मध्ये प्रति एक लाख लोकसंख्येमागे 237 असलेलं हे प्रमाण 2023 मध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे 195 पर्यंत खाली आलं आहे.
Site Admin | March 24, 2025 10:49 AM | 100 Days TB Elimination
देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू