देशातील एकूण प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दहा वर्षांत 274 टक्के वृद्धी नोंदवली गेली आहे. अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013-14 आणि 2024-25 या दहा वर्षांच्या काळात, कर विभागाने जारी केलेल्या परताव्यात 474 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर करपरतावा दाखल करणाऱ्या करदात्यांमध्येही 133 टक्के वाढ झाली आहे. डिजीटल पायाभूत सुविधांचा अवलंब केल्यामुळे कर प्रशासनातील परिवर्तन दिसून आल्याचंही विभागानं नमूद केलं आहे.
Site Admin | July 14, 2025 10:07 AM | Tax
प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या 10 वर्षांत 274 टक्के वृद्धी
