जम्मू-काश्मीरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं आयोजन

जम्मू-काश्मीरमध्ये, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज जम्मूच्या अभिनव थिएटरमध्ये तावी फिल्ममोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. चित्रपट निर्माते, कलाकार आणि सर्जनशील व्यावसायिकांच्या प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी जम्मू काश्मीर सिने असोसिएशननं हा लघुपट महोत्सव आयोजित केला आहे. उदयोन्मुख प्रतिभेला प्रोत्साहन देण्याबरोबरच सिनेमाच्या माध्यमातून जम्मू काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार या निमित्ताने होणार आहे.