September 24, 2025 1:07 PM | TASL

printer

टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या संरक्षण उत्पादन केंद्राचं उद्घाटन

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मोरोक्कोचे संरक्षणमंत्री अब्देलतीफ लौदी यांनी मोरोक्कोच्या बेरेचिद इथं टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या संरक्षण उत्पादन केंद्राचं उद्घाटन केलं. मोरोक्को आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीनं हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याची ग्वाही सिंह यांनी यावेळी दिली. आत्मनिर्भर भारताचं ध्येय फक्त स्वतःसाठी उत्पादन करणं नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम दर्जाच्या उत्पादनांचा विश्वासार्ह स्रोत म्हणून भारताला उभं करणं आहे, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.