डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सूचना नोंदवण्याकरता आरोग्य मंत्रालयाकडून नवीन वेब पोर्टल सुरु

वैद्यकीय व्यवसायातल्या व्यक्तींची सुरक्षा आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुरक्षित रहावी याकरता शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत झाली. कॅबिनेट सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कृती दलाकरता सूचना नोंदवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं “Suggestions to NTF” या नावाने  नवीन पोर्टल सुरु केलं आहे. 

 

यासंदर्भात राज्यसरकारांनी आपापल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमधे किंवा रुग्णालयांमधे केलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहितीही आरोग्य मंत्रालयानं मागवली आहे.  यासंदर्भात विविध संबंधितांनी आपल्याकडे व्यक्तिशः सूचना केली असून आतापर्यंत ३०० ते ४०० सूचना मिळाल्या असल्याचं कृती दलाच्या सदस्यांनी बैठकीत सांगितलं.  कृती दलाची बैठक उद्या दूरदृष्यप्रणालीद्वारे होणार आहे. सुरक्षेसाठी तात्काळ करण्याच्या उपाययोजनांवर त्यावेळी चर्चा होईल. केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय गृह सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील तसंच सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक त्यात सहभागी होतील.