डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलीस दलानं करावं – मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलाकरीता नवीन कार्यालयं, वाहनं, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यापुढेही पुण्यासारख्या शहरांमध्ये अधिकाधिक घटनांच्या अनुषंगानं पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे, पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले…

 

फडणवीस यांच्या हस्ते कॉप-24 या उपक्रमाअंतर्गत दुचाकी आणि चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्याची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.